प्रस्तावना
शेअर मार्केटच्या टेक्निकल एनालिसिस मध्ये बर्याच गोष्टी आहेत. त्या सर्वच्या सर्व संकल्पनांची, एनालिसिसच्या पद्धतींची माहिती घेऊन मग त्यानंतर स्वतःचे एनालिसिस करायला सुरुवात केली तर त्यात इतका प्रचंड वेळ जाणार आहे आणि ते सर्व इतके किचकट विषय आहेत की सामान्य माणसाला ते समजणारही नाहीत, त्या सर्व गोष्टी समजायच्या असतील तर स्वतःला त्यात झोकून द्यावे लागते, तरीही ते कमीच आहे. कारण हजारो लोकांनी बनवलेले हजारो प्रकारचे एनालिसिस सध्या अभ्यासासाठी उपलब्ध आहे आणि त्यात दिवसेंदिवस भर पडतच आहे, प्रत्येकाचे स्वतःचे असे वेगळे एनालिसिस असू शकते त्यामुळे याच्यापेक्षा त्याचे भारी अन त्याच्यापेक्षा आणखी कोणाचे भारी असे महणून जर आपण फक्त शिकण्याच्या प्रक्रियेतच अडकत राहिलो तर विनाकारण वेळ वाया जाणार आहे आणि हाती काहीच लागणार नाही. म्हणून या छोट्या पुस्तकातून टेक्निकल एनालिसिसच्या उदयापासून वापरल्या जाणार्या व त्याच्या मूळ अशा संकल्पना व गोष्टीच आपण जाणून घेणार आहोत. येथे जे टेक्निकल एनालिसिस चे ज्ञान मिळणार आहे ते बक्कळ पैसा कमावण्यासाठी पुरेसे आहे , फक्त त्याच्या जोडीला फंडामेंटल एनालिसिसही विचारात घ्यायला हवे. फंडामेंटल एनालिसिस हा विषय फारसा काही मोठा नाही, अगदी तासाभरात तो तुम्ही एखाद्या चांगल्या जाणकाराकडून शिकू शकता, त्याचे एक वेगळे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत. तूर्तास, हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा.
"टेक्निकल एनालिसिस म्हणजे घडणार्या घटनांच्या दृश्य चित्रांचा अभ्यास"
◆◆◆
technical analysis pdf, technical analysis course, what is technical analysis, technical analysis of stocks, technical analysis books, technical analysis of stocks pdf