टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण ९


टेक्निकल एनालिसिस बद्दल काही महत्वाचे 
 
 
        एखाद्या ट्रेड मध्ये प्रवेश कधी करायचा व त्यातून बाहेर कधी पडायचे याबद्दलचे संकेत आपल्याला टेक्निकल एनालिसिस कडून घ्यायचे आहेत. केवळ हेच एनलिसिस म्हणजे तुमचा ट्रेडिंगचा आधार बनू नये. चांगल्या कंपनीची निवड हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. चांगल्या कंपन्या कशा फिल्टर करू शकता याची माहिती यापूर्वीच 'शेअर मार्केटचा गनिमी कावा' या पुस्तकात आपण पाहिली असेलच, नसेल तर तेही पुस्तक तुम्ही वाचू शकता, त्यात बर्याच स्ट्रॅटजीची तसेच मार्केटचे ट्रेंड, त्याचे वागणे यासह अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. 

        आपण आतापर्यंत पाहिलेल्या माहितीव्यतिरिक्त आणखी खूप माहिती ही टेक्निकल एनालिसिस मध्ये सामावलेली आहे, परंतु आपल्याला फक्त माहितीचे भंडार बनायचे नाही, लोकांची इथेच गफलत होते. ते फक्त माहिती गोळा करण्यावर भर देतात व 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशीच अनेकांची गत होते. अनेक इंडिकेटर तुम्हाला पहायला मिळतील, तुम्ही प्रत्येक इंडिकेटर वापरत बसाल व नेहमी त्याप्रमाणे नवीन स्ट्रॅटजी बनवत राहाल तर फक्त तेच करत बसाल, कशातच तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. प्रत्येक इंडिकेटर हा चुकीचे सिग्नल देतोच, कारण मार्केट हे माणसं चालवतात व माणसांच्या भावना कधीही बदलू शकतात, अचानक खरेदी किंवा विक्री चालू होऊ शकते. म्हणून आपण पाहिलेली माहिती ही भरपूर आहे, या आधारावर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शेअर खरेदीची किंवा विक्रीची संधी ओळखू शकता. याच माहितीचा वापर करून एक्स्पर्ट बनण्यावर भर दिलात तर तुमच्या इतके यशस्वी कोणीच असणार नाही. हे सर्व अनुभवातून सांगतो आहे, सिम्पल व बेसिक माहिती व स्ट्रॅटजीच जास्त यशस्वी होते. तुम्ही 100 टक्के योग्य प्रकारे भाकीत करण्याचा कधीच प्रयत्न करू नका, फक्त मार्केट जसे जात आहे त्यात आपले आडाखे स्टॉपलॉस लावून वापरत राहिलात तर मार्केट तुम्हाला धनवान नक्कीच बनवेल. टेक्निकल एनालिसिस साठी तुम्ही investing.com ही वेबसाइट वापरू शकता, अगदी सहज समजेल व वापरायला सोपी अशी ही वेबसाइट आहे. याच वेबसाइटवर प्रत्येक शेअरच्या बद्दल त्यांनी काही डिफॉल्ट इंडिकेटर वापरुन एक खरेदी-विक्री दाखवणारा त्यांचा इंडिकेटर बनवला आहे, तुम्हाला जर कसलीच झंझट नको असेल तर तुम्ही या इंडिकेटरकडे पाहून तुमचे निर्णय घेऊ शकता. फक्त investing.com वर जाऊन शेअर सर्च करा, व खाली स्क्रोल केले की हा त्यांचा इंडिकेटर तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर upstox व zerodha यांचा चार्ट देखील टेक्निकल एनालिसिस साठी खूप चांगला व वापरण्यास सोपा आहे.  

या साहित्यासाठी दिलेल्या आपल्या अमूल्य वेळाबद्दल धन्यवाद !
 
'शेअर मार्केटचा गनिमी कावा' हे पुस्तकही अवश्य वाचा. आम्हाला मदत करण्यासाठी Help Paay Trade या पेजला भेट द्या. 
◆◆◆