टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण ८


आरएसआय (RSI) 
 
 
        RSI म्हणजे 'रिलेटीव स्ट्रेन्थ इंडेक्स'. हा एक लिडिंग इंडिकेटर आहे. लिडिंग म्हणजे भविष्यातील चालीविषयी भाकीत करणारा. 0 ते 100 च्या दरम्यान याची किंमत असते. RSI दाखवणारी एक लाइन 0 ते 100 दरम्यानच्या बॉक्स मध्ये तुम्हाला चार्टवर दिसेल. त्यासाठी 'स्टडीज' किंवा 'इंडिकेटर' या सेक्शन मधून तुम्हाला ते निवडावे लागते. याला सुद्धा मुविंग अॅवरेज प्रमाणे तुम्हाला हवे तसे 14 कॅन्डलचे अॅवरेज, 20 कॅन्डलचे अॅवरेज असे तुम्ही बदलू शकता. 14 कॅन्डलचे अॅवरेज दाखवणारा RSI सर्रास वापरला जातो. RSI लाइन 50 च्या खाली असेल तर तो शेअर बेयरीश झोन मध्ये आहे असे मानतात व याउलट ती लाइन 50 च्या वर असेल तर तो शेअर बुलीश झोन मध्ये आहे असे मानतात. एखाद्या चांगल्या शेअरचा RSI जेव्हा 30 च्या खाली किंवा 0 च्या जवळ येतो तेव्हा लोक तिथे सपोर्ट झोन म्हणून पाहतात व जेव्हा RSI 70 च्या वर किंवा 100 च्या जवळ जातो तेव्हा लोक तिथे रेसिस्टंस झोन म्हणून पाहतात. कॅन्डलच्या बुलीश किंवा बेयरीश पॅटर्न सोबत RSI कुठल्या झोन मध्ये आहे हे पाहिले तर आपल्याला बाजाराचा कल ओळखण्यास आणखी मदत होते. बाजार खूपच बुलीश असेल तर मग RSI 100 च्या जवळच बरेच दिवस राहतो व जर खूपच बेयरीश असेल तर 0 च्या जवळ बरेच दिवस राहतो. RSI इंडिकेटर तुम्ही तुम्हाला हव्या त्या टाइम इनटर्वलच्या चार्टवर वापरु शकता.  
◆◆◆