मुविंग अॅवरेज
चार्टवरील कॅन्डलच्या किंमतीचे अॅवरेज काढून तयार झालेली चार्टवर एक लाइन दिसते, ती लाइन म्हणजे मुविंग अॅवरेजची लाइन असते. बाय डिफॉल्ट ही लाइन चार्टवर दिसत नाही, तिला तुम्हाला चार्टवर लावावे लागते. त्यासाठी 'स्टडीज' किंवा 'इंडिकेटर' या सेक्शन मधून तुम्हाला ते निवडावे लागते. तुम्ही या अॅवरेज मध्ये तुम्हाला हवा तसा बदल करू शकता, म्हणजे तुम्हाला किती कॅन्डलचे अॅवरेज हेवे ते घेऊ शकता. हा बदल तुम्ही या मुविंग अॅवरेज च्या सेटिंग मध्ये जाऊन करू शकता. समजा मला 20 कॅन्डलचे अॅवरेज चार्टवर लावायचे आहे तर मी मुविंग अॅवरेजच्या सेटिंग मध्ये जाऊन तिथे 20 ही वॅल्यू टाकीन. मुविंग अॅवरेज अनेक प्रकारचे आहेत. चांगल्या रिझल्टसाठी 'सिम्पल मुविंग अॅवरेज' वापरणेच फायद्याचे आहे, यातही 'एक्स्पोंनेंशियल मुविंग अॅवरेज' उत्तम रिझल्ट देते.
मुविंग अॅवरेज लाइन वरुन तुम्ही ठरवू शकता की शेअरची किंमत मागील काही दिवसाच्या अॅवरेज पेक्षा खाली जात आहे की वर जात आहे, यावरून मार्केटचा कल कुणीकडे आहे हे संकेत मिळतात. 20 मुविंग अॅवरेज व 50 मुविंग अॅवरेज हे दोन्ही एकाच वेळी सर्रास वापरले जातात. तुम्ही कितीही इंडिकेटर एकाच वेळी चार्टवर लावू शकता, परंतु गोंधळ टाळण्यासाठी कमीत कमी व निवडक इंडिकेटरवर काम केलेले कधीही फायद्याचे ठरते. 50 मुविंग अॅवरेजला 20 मुविंग अॅवरेजने क्रॉस केले व त्याचा प्रवास वरच्या दिशेला सुरू झाला तर मार्केट बुल रन मध्ये जात आहे असे मानतात, व याउलट ते क्रॉस करून खालच्या दिशेला जात असेल तर मार्केट बेयरीश होत आहे असे मानतात. तुम्ही 1 दिवसाच्या, 1 तासाच्या, 15 मिनिटांच्या किंवा तुम्हाला हव्या त्या कोणत्याही इनटर्वलच्या चार्टवर हे वापरू शकता. परंतु 50 व 20 मुविंग अॅवरेजचे कॉम्बिनेशन हे एकदिवसीय चार्टवर जास्त प्रभावशाली ठरते, पोजिशनल ट्रेडिंग साठी याचा वापर अधिक फायद्याचा ठरू शकतो. तुम्हाला कमी काळा करता ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचे स्वतःचे कॉम्बिनेशन बनवू शकता. इंट्रा डे करणार्या लोकांसाठी 6 मुविंग अॅवरेज व 25 मुविंग अॅवरेज असे कॉम्बिनेशन फायद्याचे ठरू शकते. मात्र कधी कधी डाव उलटही पडतो, त्यामुळे स्टॉप लॉस लावून ट्रेड करणे महत्वाचे आहे. कुठल्याही इंडिकेटरची खासियत ही आहे की, अनेक वेळा स्टॉपलॉस हिट होईल पण एक-दोन वेळा अशा येतील जेव्हा भरमसाट प्रॉफिट होईल. म्हणून मैदानात टिकून राहणे महत्वाचे आहे, आपल्या स्ट्रॅटजीमध्ये सकारात्मक बदल करणे महत्वाचे आहे.
◆◆◆