टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण ६


वॉल्यूम एनालिसिस 
 
 
        जवळपास सर्वच नवीन लोक वॉल्यूम विसरूनच जातात. फक्त कॅन्डल पॅटर्नवरच त्यांचा भर असतो. जरा विचार करा, एखाद्या दुकानातील भज्यांना खूप मागणी आहे हे तुम्हाला कसे कळते ? अर्थातच, त्या दुकानातील गर्दी वरुन ! तसंच, एखाद्या शेअरला खूप मागणी आहे हे त्याच्या वाढत्या वॉल्यूम वरुन कळते. एका बुलीश कॅन्डल पॅटर्न सोबत वाढलेला वॉल्यूम हा त्या पॅटर्नला बळकटी देतो. तर याच्या विरुद्ध, एका बेयरीश कॅन्डल पॅटर्न सोबत वाढलेला वॉल्यूम हा त्या बेयरीश पॅटर्नला बळकटी देतो. तसेच, शेअरची किंमत सपोर्ट झोन जवळ येताच वाढलेला वॉल्यूम त्या सपोर्ट झोन ला बळकटी देतो व याचप्रमाणे याउलट रेसिस्टंसच्या बाबतीत असते. पण वॉल्यूम तर रोज जवळपास सारख्या प्रमाणात कमी जास्त होतो, मग तो एखाद्या पॅटर्न बरोबर वाढला की घटला कसे ओळखणार ? त्यासाठी अॅवरेज वॉल्यूम विचारात घ्यावा लागेल, चार्टवर तुम्हाला अशी अॅवरेज वॉल्यूम लाइन लावता येते. तुम्ही 10 दिवस, 20 दिवस असे अॅवरेज लावू शकता, म्हणजे मागील 10 दिवसाच्या अॅवरेज वॉल्यूम पेक्षा एखाद दिवशीचा वॉल्यूम जास्त असेल तर तुम्ही तो विचारात घेऊ शकता. उदाहरण पाहू.


वरील चार्ट मध्ये एक बुलीश पॅटर्न तयार झाला व त्याचबरोबर त्याच्या आसपास वॉल्यूम मध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर शेअरची किंमत किती वर गेली आहे ते दिसतच आहे. बुलीश पॅटर्न परंतु वॉल्यूम नेहमीसारखाच असेल तर तो एक कमकुवत संकेत मानला जातो, तसेच बेयरीश पॅटर्नच्या बाबतीत व सपोर्ट, रेसिस्टंसच्या बाबतीत 
◆◆◆