सपोर्ट व रेसिस्टंस
सपोर्ट: शेअरच्या किमतीला खाली पडण्यापासून सपोर्ट देणारा झोन म्हणजे सपोर्ट झोन असतो. यालाच डिमांड झोन असेही म्हणतात. म्हणजे या झोन मध्ये शेअरची किंमत आली की सर्वांना तो हवा असतो त्यामुळे लोक तिथे भरमसाट खरेदीच्या ऑर्डर टाकतात. याचा परिणाम असा होतो की शेअरची किंमत त्या झोन मध्ये येताच परत वरती जाऊ लागते. बहुतेक लोक सपोर्ट म्हणजे एक फिक्स किंमत मानतात, पण फिक्स किंमत कधीच नसते. तो एक झोन असतो, उदाहरणार्थ 100 रु ते 102 रु. अशाप्रकारे. चार्ट पाहताना मागील चार्ट मध्ये कुठे असा झोन बनला होता ते पाहून लोक त्याच किंमतीच्या आसपास परत सपोर्ट झोन बनेल अशी अपेक्षा करून त्याला सपोर्ट मानतात. किंवा एखादा शेअर आजपर्यंत एका डाउन ट्रेंड मध्ये बहुतेक वेळा अमुक टक्के पडला व त्यांतर पुन्हा अप ट्रेंड सुरू झाला असे टक्केवारीनेही सपोर्टचा झोन ठरवतात. म्हणजे समजा, आजपर्यंतच्या इतिहासात एका डाउन ट्रेंड मध्ये टाटाचा शेअर 8 टक्के पडला असेल व पुन्हा तिथून वर आला असेल तर मग लोक असे मानतात की भविष्यातही टाटाचा शेअर 8 टक्के खाली आला तर तिथे एक खरेदीची संधी असू शकते.
रेसिस्टंस: शेअरच्या किमतीला वर जाण्यापासून विरोध करणारा झोन म्हणजे रेसिस्टंस झोन असतो. यालाच सप्लाय झोन असेही म्हणतात. म्हणजे या झोन मध्ये शेअरची किंमत आली की सर्वांना तो विकायचा असतो त्यामुळे लोक तिथे भरमसाट विक्रीच्या ऑर्डर टाकतात. याचा परिणाम असा होतो की शेअरची किंमत त्या झोन मध्ये येताच परत खाली जाऊ लागते. चार्ट पाहताना मागील चार्ट मध्ये कुठे असा झोन बनला होता ते पाहून लोक त्याच किंमतीच्या आसपास परत रेसिस्टंस झोन बनेल अशी अपेक्षा करून त्याला रेसिस्टंस मानतात. किंवा एखादा शेअर आजपर्यंत एका अप ट्रेंड मध्ये बहुतेक वेळा अमुक टक्के वधारला व त्यांतर पुन्हा डाउन ट्रेंड सुरू झाला असे टक्केवारीनेही रेसिस्टंसचा झोन ठरवतात. म्हणजे समजा, आजपर्यंतच्या इतिहासात एका अप ट्रेंड मध्ये टाटाचा शेअर 8 टक्केने वधारला असेल व पुन्हा तिथून खाली आला असेल तर मग लोक असे मानतात की भविष्यातही टाटाचा शेअर 8 टक्के वधारला तर तिथे एक विक्रीची संधी असू शकते.
सपोर्ट व रेसिस्टंस झोन मध्ये शेअर आला तर तो त्याची चाल बदलेल असे काही फिक्स नसते. पण बहुतेक वेळा तो चाल बदलताना दिसतो व त्यामुळे फायदा होतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा शेअर सपोर्ट तोडून आणखी खाली पडू लागेल तेव्हा खरेदीच्या ट्रेड मधून बाहेर पडले तर नुकसान टळू शकते. कारण अशा वेळी एक मोठा डाउन ट्रेंड येण्याची शक्यता असते. तसेच रेसिस्टंसच्याही बाबतीत. शेअरने रेसिस्टंस तोडला तर पुढे एक मोठा अप ट्रेंड येण्याची शक्यता असते.
◆◆◆